Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युतीच्या चर्चेसाठी शहा, गडकरी आणि राजनाथ सिंह जाणार मातोश्रीवर ?

Amit-Rajn-Gadkari

युतीच्या चर्चेसाठी शहा, गडकरी आणि राजनाथ सिंह जाणार मातोश्रीवर ?

लोकसभा निवडणुका जवळ येताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच आता युतीबाबत चर्चा करण्यासाठी आता भाजपचे दिल्लीतील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेने सोबत युती करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह असे भाजपचे ज्येष्ठ नेते ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सध्या शिवसेना- भाजपमध्ये यंदाच्या निवडणुकीसाठी 50-50 जागवाटपाच्या फॉम्युर्ल्यावर बोलणी सुरु असल्याची माहिती आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *