Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

Ajinkyarana Patil Twitter PP

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. संग्राम कोते पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील वजनदार नेते माजी राज्यमंत्री आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव तसेच माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा अजिंक्य राणा पाटील यांच्यासोबत सामान्य कार्यकर्त्यांपैकी पुण्याचा रविकांत वरपे, बीडचा मेहबूब शेख, मीडिया प्रभारी सुरज चव्हाण यांचीही नावे स्पर्धेत आहेत. पण त्यातल्या त्यात अजिंक्य राणा पाटील यांचं पारडं जड आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती कारायची याबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी अजून तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्ष घराणेशाहीला स्थान देत एखाद्या नेत्याच्या मुलाची निवड करणार कि पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्षपदाचा मान देईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *