Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेना शिंदे गटाने आठ जागांवरील उमेदवारी केली जाहीर; ‘या’ विद्यमान खासदाराचा पत्ता कट

पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही

मुंबई, दि. २८: शिवसेना ठाकरे गटाने काल लोकसभा निवडणूक २०२४ साठीची आपली १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर सगळ्यांच्या नजरा शिवसेना शिंदे गटाची यादी कधी जाहीर होतेय याकडे खिळल्या होत्या. आज अखेर शिंदे गटाने आठ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विलक्षण बाब म्हणजे या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव नमूद केलेले नाही. शिवाय विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले उमरेडचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे.

May be an illustration of blueprint, ticket stub and text

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *