Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शेकापचे हरेश केणी होतील का पनवेलचे सुभेदार ? जाणून घ्या मतदारसंघाची नेमकी स्थिती

शेकापचे हरेश केणी होतील का पनवेलचे सुभेदार ? जाणून घ्या मतदारसंघाची नेमकी स्थिती


पनवेल विधानसभा क्षेत्र – १८८
हरेश मनोहर केणी
पक्ष – शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)
निशाणी – बैलगाडी/खटारा


पनवेल(सोनाली भवर): रायगड जिल्ह्यातील अलिबाग नंतर पनवेल तालुका हा शेकापचा गड मनाला जातो. पण गेल्या काही वर्षात येथे एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. गेल्या २ विधानसभा निवडणुकांत आमदार अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपचा झाला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या शेकापच्या हातात राहिल्या.
या विधानसभा निवडणुकीपूर्वी आधी असे मानले जात होते की पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे हे ही निवडणूक लढवतील पण ऐनवेळी त्यांचे नाव मागे गेले आणि उमेदवारीची माळ तळोजा प्रभागातील पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केणी यांच्या गळ्यात पडली.

जिंकण्यासाठी जमेच्या बाजू

हरेश केणी हे पदवीधर असून आता पर्यंत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य आणि पनवेल पंचायत समिती सभापतीपद भूषविले आहे. रस्ते, पाणी आदी प्रश्नांवर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुख्यत्वे काम केले आहे. पनवेल ग्रामीण भागात पक्षाच्या असलेल्या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर ते विद्यमान भाजप आमदार प्रशांत ठाकूर व अपक्ष कांतीलाल कडू यांना जोरदार टक्कर देऊ शकतात. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षांचा त्यांना फायदा होऊ शकतो.

या झाल्या हरेश केणी यांच्या जमेच्या बाजू पण त्यांच्या समोर अनेक आवाहनेही आहेत.
पनवेल विधानसभा क्षेत्रातील शहरी भाग ज्यात कामोठे, कळंबोली, पनवेल-नवीन पनवेल, खारघर विभागाचा समावेश होतो तेथून त्यांना मतं मिळवण्यासाठी खूप कष्ट उपसावे लागतील. शिवाय गेल्या ५ वर्षात शेकापने सत्ताधारी भाजप विरोधात कोणतेच मोठे आंदोलन केले नाही. त्यातही रस्ते आणि पाणी या समस्यांशी निगडित आंदोलनांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात जरा मरगळ आली होती त्यामुळे हरेश केणी यांना स्थानिक पातळीवर मतदानादिवशी मतदारांना बाहेर काढण्यासाठी जरा जास्त कष्ट करावे लागतील. घराणेशाही टाळत शेकापने हरेश केणी या स्वच्छ चारित्र्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला पनवेल विधानसभा निवडणुकीचे तिकीट देऊन वेगळी खेळी खेळली आहे. या खेळीत पक्षाला किती यश येईल हे २४ तारखेला निकाल लागतील तेव्हाच कळेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *