Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आ. शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्यातरी अफवाच

आ. शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्यातरी अफवाच

गेले ३ दिवस मनसेचे विधानसभेतील एकमेव आमदार शरद सोनवणे हे मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. आणि आजतर ते एकदाचा मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रवेश करणार असल्याचे माध्यमांत झळकायला लागले. तेव्हा आमच्या प्रतिनिधीने त्यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क केला असता त्यांनी ह्या साऱ्या शक्यता फेटाळून लावल्या. ही नुसती अफवा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोणीतरी जाणून बुजून ह्या अफवा पसरवत असल्याचे ते म्हणाले.

ह्या सर्व अफवांना अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची पार्श्वभूमी असू शकते. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा १३ वा वर्धापन दिन आहे आणि त्या आधीच असे काही वृत्त पसरल्यामुळे मनसैनिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद सोनवणे हे एकमेव मनसे आमदार जुन्नर मतदारसंघातून निवडून आले. पण कालांतराने त्यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे माध्यमात त्यांच्या मनसेला सोडचिट्ठी देण्याच्या बातम्या अधून-मधून येत असतात.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *