Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्रा. विश्वनाथ साबळे यांची राज्याच्या कला संचालक पदावरून एकाएकी उचलबांगडी; पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे प्रकरण शेकल्याची चर्चा

सहा महिन्यांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या प्राचार्य राजीव मिश्रा यांची कला संचालक पदी पुनर्नियुक्ती

मुंबई, दि. २९: मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स चे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांची राज्याच्या कला संचालक पदावरून आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर(सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय) चे प्राचार्य राजीव मिश्रा यांची कला संचालक पदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. या संबंधीचा शासन आदेश आज दि. २९/१२/२०२२ रोजी निर्गमित करण्यात आला.

प्रा. विश्वनाथ साबळे यांची नियुक्ती पासूनची गेल्या जवळपास ६ महिन्यांची कारकीर्द ही वादग्रस्त अशीच राहिली होती. या बाबतचा अनुभव महाराष्ट्र वार्ता च्या शोध पत्रकारिता विभागालाही आला होता. जुलै महिन्यात महाराष्ट्र वार्ता ने पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत यांच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणावर प्रकाश टाकणारी एक सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांनी जून २०२२ मध्ये राहुल बळवंत उर्फ राहुल कोळी यांची पुराव्यानिशी राज्याचे तत्कालीन व सध्याचे नवनियुक्त कला संचालक राजीव मिश्रा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या संदर्भातले कला संचलनालयातील रेकॉर्ड तपासल्यानंतर मिश्रा यांनी कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. परंतु, तत्पूर्वीच त्यांची एकाएकी उचलबांगडी करण्यात आली व तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या मर्जीतील प्रा. विश्वनाथ साबळे यांची या ठिकाणी नियुक्ती केली. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांनी या प्रकरणी कारवाई करण्याबाबत प्रा. साबळे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. महाराष्ट्र वार्ता ने ही त्यांना या प्रकरणी अद्याप कारवाई करण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत अनेकदा प्रश्न विचारले. परंतु, त्यांनी या प्रश्नांचे कोणतेच उत्तर दिले नाही. अखेर अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत यांच्यावर कारवाई करण्यास प्रा. विश्वनाथ साबळे हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत याची खात्री पटल्यामुळे मनीषा धारणे यांनी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्याकडे साबळें विरोधात लेखी तक्रार दिली. यात त्यांनी गेल्या आठवड्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भारतीय कला प्रसारिणी सभेचा बोगस सचिव पुष्कराज पाठक याच्यावर अप्रत्यक्षपणे महेरनजर दाखवत असल्याचे म्हटले होते.

Crime! पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा मनीषा धारणे यांचा गंभीर आरोप

अशाच प्रकारे कला क्षेत्राशी संबंधित ‘चिन्ह’ या मासिकाने ही विश्वनाथ साबळे यांच्या जे. जे. कला महाविद्यालयातील व एकूणच कला संचालनालयाशी संबंधित कारभाराविरुद्ध रान पेटवले होते. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात प्रा. विश्वनाथ साबळे यांनी कला शिक्षण घेतेल होते. नेमकं याच कॉलेज ला संचालित करणार्‍या भारतीय कला प्रसारिणी सभा च्या बनावट सचिव व विश्वस्तांचं प्रकरण आठवड्याभरापूर्वी बाहेर येतं काय आणि आज अचानक त्यांची पदावरून गश्चंती होते काय सारंच आनकलनीय म्हणावं असंच. परंतु याच योगायोगाची चर्चा आज दिवसभर कला वर्तुळात चवीने चघळली जात होती.

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या पुष्कराज पाठक Pushakaraj Pathak सह एकूण १० आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *