‘या’ NBFC ना ६ महिन्यात लोकपालाची नियुक्ती करण्याचे ‘आरबीआय’चे आदेश
मुंबई, दि.१६: रिझर्व्ह बँकेने सर्व गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांना अर्थात NBFCला ६ महिन्यात लोकपालाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. १० पेक्षा अधिक शाखा असलणाऱ्या ठेवी स्वीकारणाऱ्या NBFC ला आणि ठेवी न स्विकारणाऱ्या पण ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या NBFC ला हे आदेश लागू होतील. अंतर्गत तक्रार व्यवस्थापनात हा लोकपाल सर्वोच्च असेल.
NBFC ने अंशतः किंवा पूर्ण अमान्य केलेल्या तक्रारींचा आढावा लोकपाल घेईल आणि तक्रारदाराला अंतिम निर्णय कळवेल. सर्वसामान्यांना या अंतर्गत लोकपालाकडे थेट कुठलीही तक्रार करता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांशी संबंध येत नसलेल्या NBFC ला अंतर्गत लोकपालाची नियुक्ती करण्याची गरज नाही, असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.