Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रायगडावरचं दृश्य पाहून खासदार संभाजीराजे भडकले

रायगडावरचं दृश्य पाहून खासदार संभाजीराजे भडकले

रायगड: भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती युवराज संभाजी राजे काल भलतेच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्याला कारणही तसेच आहे. काल खासदार संभाजीराजे रायगडावर चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की रोप वे सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी कोणत्याही परवानग्यांशिवाय काही कामे सुरू केली आहेत. यानंतर याबाबतची तक्रार संभाजीराजेंनी संबंधित विभागाकडे केल्याचे कळते. याबाबत चा राग त्यांनी काल फेसबुक च्या माध्यमातून व्यक्त केला.

ते आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, “काल दुर्गराज रायगडवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी गेलो असता, अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. यामध्ये रोपवे च्या लोकांनी नियम धाब्यावर बसवून, परवानगी न घेता बांधकाम चालू केल्याचे दिसून आले. लोकांच्या सोयी सुविधेसाठी आणि संवर्धनाच्या कामासाठी प्राधिकरणाला रोखले जाते. नियमांकडे बोट दाखवून अनेक कामांना स्थगीती देणाऱ्या पुरातत्व खात्याने रायगड विकास प्राधिकरणाच्या माघारी अशी परवानगी दिलीच कशी हा माझा प्रश्न आहे. अश्या अनैतिक कामांवर वचक बसवण्याकरिता त्यांच्यावर गुन्हे दाखल का नाही करण्यात आले? रोपवे चा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल.

राजधानी रायगड चे जतन व संवर्धन योग्यप्रकारे व्हावे यासाठी मी व माझं कार्यालय आहोरात्र झटत असतो.
गडावर एखाद बाधंकाम करायच असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची अवश्यकता असते, हा नियम रोप वे वाल्यांना लागू नाही का….?”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *