Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा” ‘कनसे’ला खा. धैर्यशील मानेंचे आव्हान

“कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा” ‘कनसे’ला खा. धैर्यशील मानेंचे आव्हान

कोल्हापूर: गुरुवारी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भिमाशंकत पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांबाबत प्रक्षोभक वक्तव्य केले. या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी घेत त्यांना थेट आवाहन दिले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करताना भीमाशंकर पाटील म्हणाले की, “कर्नाटकात असलेल्या मराठी भाषिकांना व हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला.”

यावर प्रत्युत्तर देताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की, “गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो ” कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ”. आजवर महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे.

अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *