Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्‍ग्रस्तांना मदतीचे वाटप

मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्‍ग्रस्तांना मदतीचे वाटप

मुंबई/अलिबाग/मुरुड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चौल, बोर्ली, मुरुड येथे भेट देणार आहेत. निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.

सकाळी १० वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतील, ११ वाजता चौलमधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांचे बोर्ली येथे आणि साडेबारा वाजता मुरुड येथे आगमन होईल. दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी करून मदतीचे वाटप करण्यात येईल. मुरुड येथे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. दुपारी ३ वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *