Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

…आणि आर. माधवन काँग्रेसवर भडकला

…आणि आर. माधवन काँग्रेसवर भडकला

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षात प्रचारासाठी चढाओढ सुरु आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात होता. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांची टिंगल उडविण्यात आली आहे. काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडिओबद्दल बॉलिवूड अभिनेता आर. माधवन याने संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या या ट्विटला विरोध करताना आर. माधवनने असे म्हटले आहे की, ‘हे अतिशय खराब आहे. राजकीय विरोध ठिक आहे, परंतु मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि असे व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही चीनसमोर आपल्या देशाची नाचक्की करत आहात. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून असे काही पोस्ट होईल याची अपेक्षा नव्हती.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *