Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वैज्ञानिक नंबी नारायणन यांना ‘पद्मभूषण’ तर गौतम गंभीर, सुनील छेत्री हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

वैज्ञानिक नंबी नारायणन यांना ‘पद्मभूषण’ तर गौतम गंभीर, सुनील छेत्री हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली: इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांचा ‘पद्म भूषण’ देऊन सन्मान करण्यात आला. अंतराळ संशोधन कार्यामध्ये त्यांच्या भरीव योगदानाबद्दल केंद्र सरकारने नंबी यांचा ‘पद्म भूषण’ पुरस्काराने सन्मान केला. ७० च्या दशकात त्यांनी भारतात द्रव्य इंधनावर काम केले होते.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यासह बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग आणि तिरंदाज एल बोम्बल्या देवी यांना शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

बीड मधील सय्यद शब्बीर यांनाही आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. सय्यद शब्बीर गेली पन्नास वर्षे निस्वार्थपणे गोसेवा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोनशेहून अधिक गाईंना जीवनदान दिले आहे.

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *