२४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सेवा उपलब्ध
पुणे, दि. २३: प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (आरपीओ) पुणे यांच्या मार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) येथे २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पासपोर्ट मोबाईल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांना लवकरात लवकर अपॉइंटमेंट मिळाव्यात तसेच शेवटच्या मैलापर्यंतच्या लोकांना पासपोर्ट सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हे शिबीर आयोजित केले जात आहे.
नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद आणि अर्जदारांसाठी सुलभता आणि सोयी वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ही पासपोर्ट सेवा २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पासपोर्ट मोबाईल व्हॅनद्वारे संबंधित सेवा प्रदान केल्या जातील. (शनिवार, २७ सप्टेंबर आणि रविवार, २८ सप्टेंबर वगळून)
कागदपत्रे:
ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अर्जदारांसाठी https://www.passportindia.gov.in वरील कागदपत्रांच्या चेकलिस्ट काळजीपूर्वक वाचा.
[पासपोर्ट कायदा १९६७ च्या कलम ५ आणि पासपोर्ट नियम, १९८० च्या नियम ५ नुसार पासपोर्ट कार्यालय अर्जदाराची सर्व चौकशी करू शकते तसेच आवश्यकतेनुसार अर्जदाराला अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्याची मागणी करू शकते.]
मोबाइल व्हॅन अपॉइंटमेंट कशी बुक करावी:
१. पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) ला भेट द्या आणि सामान्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.
२. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’ वर जा, ‘पासपोर्ट व्हॅन, पुणे विद्यापीठ’ हे स्थान निवडा आणि अपॉइंटमेंट बुक करा.
पासपोर्ट मोबाइल सेवा केंद्राची तारीख आणि स्थान तपशील:
- तारखा: २४, २५, २६, २९, ३० सप्टेंबर तसेच १ ऑक्टोबर २०२५.
- स्थान: वाणिज्य विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठ रोड, गणेशखिंड, पुणे, महाराष्ट्र-४११००७
- वेळ: ०८.३० ते १८.०० (अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज पावतीवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नियोजित अपॉइंटमेंट वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहोचावे.)
