पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रात १० दिवसांचा लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा राहणार चालू
पुणे: आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात ‘कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा’ बैठक घेण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर या विभागात १३ जुलै ते २३ जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक सेवा चालू राहणार आहेत.