पी. टी. उषा यांच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री
‘संजू’, ‘द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘दंगल’, ‘नीरजा’, ‘मांझी: द माउनटेन मॅन, भाग मिल्खा भाग, मेरी कोम’ या चरित्रपटांनंतर आता भारताच्या प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. यात कतरिना कैफ पी. टी. उषांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
पी.टी. उषा यांच्यावर येणाऱ्या चित्रपटासाठी प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत होते. पण काही कारणास्तव पी.टी. उषावरचा हा चित्रपट रखडला. पण आता सुमारे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे.
दिग्दर्शक रेवती एस. वर्मा यांनी पुन्हा एकदा या बायोपिकसाठी जय्यत तयारी केली आहे. रेवती यांनी या बायोपिकसाठी कतरीनाच्या नावाला पसंती दिली आहे. रेवतीने कतरीना सोबत अनेकदा चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीही रेवतीने तीची भेट घेत कथेवर चर्चा केली. अद्याप कतरीनाने या चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. पण तिने हा चित्रपट स्वीकारलाच तर हे तिचे पहिले बायोपिक असेल. साहजिकच कॅटला यासाठी खूप घाम गाळावा लागेल. शिवाय उषाकडून अॅथलेटिक्सचे धडेही घ्यावे लागतील.