Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलासा, NIA न्यायालयाचा दिलासा

Sadhavi Pradnya Singh Thakur

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलासा, NIA न्यायालयाचा दिलासा

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना NIA न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. साध्वी यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणे हे न्यायालयाच्या अखत्यारित येत नाही. याचा निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या साध्वीला भाजपनं भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. तिच्या उमेदवारीवरून वाद सुरू झालेला असतानाच मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली होती. साध्वीला निवडणूक लढविण्यास परवानगी देऊ नये व तिचा जामीन रद्द करावा, अशी मागणी पीडितांच्या वतीनं करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली.

आज, या प्रकरणी निकाल देताना ‘एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणे, हा निर्णय कोर्टाच्या अखत्यारीत नाही. याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानंच घ्यावा, असं न्यायमूर्ती विनोद पडाळकर यांनी स्पष्ट केलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *