Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे चित्रीकरण रविवारपासून अहमदाबादमध्ये सुरु झाले आहे. ओमंग कुमार दिगदर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पंतप्रधान मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय तर प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची भूमिका अभिनेता बोमन इराणी साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुरेश ओबेरॉय करत आहेत.

बऱ्याचवेळा लोकांनी मला मी रतन टाटा यांच्यासारखा दिसतो, असे सांगितले आहे. तसेच सोशल मीडियावरही अशा अनेक कॉमेंट्स मला माझ्या चाहत्यांकडून आल्या आहेत. तेव्हापासून मला असे वाटायचे की मला रतन टाटा यांची भूमिका साकारायला मिळावी. त्यातच जेव्हा दिग्दर्शक ओमंग कुमार आणि विवेक ओबेरॉय यांनी मला या भूमिकेसाठी फोन केला, तेव्हा मी लगेच होकार दिला’, अशी प्रतिक्रिया अभिनेता बोमन इराणी यांनी दिली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *