Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा भारतानं केला तीव्र निषेध

पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा भारतानं केला तीव्र निषेध

नवी दिल्ली: शीखांचे धर्मगुरु श्री गुरु नानक देवजी यांच्या पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा, भारतानं तीव्र निषेध केला आहे. शीख समाजाची सुरक्षा आणि हित जपण्यासाठी पाकिस्तान सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत असं आवाहन भारतानं केलं आहे.

गुरु नानक देवजी यांचं जन्मठिकाण असलेल्या पवित्र शहरात अशा प्रकारची घटना घडावी, हे निंदनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं आहे. पवित्र गुरुद्वाराचा अपमान करुन अल्पसंख्य शीख समुदायावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतानं केली आहे.

नानक साहेब गुरुद्वारा ही वास्तू आणि तिथल्या परिसराच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, असंही भारतानं म्हटलं आहे.

(सौजन्य – AIR)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *