Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड

पनवेल/अलिबाग: रायगड जिल्हा  परिषदेच्या अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली. पनवेलच्या योगिता पारधी यांची अध्यक्षपदी निवड झाली.

रायगड जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. राज्यात सत्तेत असलेली शिवसेना रायगड जिल्हा परिषदेत मात्र विरोधी पक्षात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेची उत्सुकता होती. परंतु शिवसेनेनं अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.

भाजपनं जळगांव जिल्हा परिषदेमधली आपली सत्ता कायम राखली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या रंजना प्रल्हाद पाटील ह्या विजयी झाल्या, तर उपाध्यक्षपदी भाजपाचे लालचंद पाटील निवडून आले.

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन, तर काँग्रेसच्या एका सदस्यानं भाजपाच्या बाजूनं मतदान केलं, तर भाजपचा एक सदस्य गैरहजर राहीला.

(सौजन्य – AIR)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *