Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गुजरात च्या समुद्रात पाकिस्तानच्या जहाजात सापडले ५०० कोटींचे अमली पदार्थ

गुजरात च्या समुद्रात पाकिस्तानच्या जहाजात सापडले ५०० कोटींचे अमली पदार्थ

जखु, गुजरात: भारतीय तटरक्षक दलाने काल दि.२१ मे रोजी एका मोठ्या कारवाईत गुजरात मधील जखुच्या समुद्र किनाऱ्याजवळ अमली पदार्थाने भरलेली एक पाकिस्तानी बोट पकडली. ‘अल-मदिना’ नामक या बोटीत अमली पदार्थांची जवळपास १९४ पाकिटं सापडली. ज्याची किंमत ५०० कोटींच्या घरात आहे.

हे अमली पदार्थ समुद्रात एका बोटी मार्फत उतरवून जखुच्या किनाऱ्यावर आणायच्या ते प्रयत्नात होते.
त्यासाठी त्यांनी ही बोट समुद्रात आंतरराष्ट्रीय समुद्राच्या सीमेजवळ थांबवली होती. खवळलेल्या समुद्रातही भारतीय तटरक्षक दलाने एक जहाज व दोन इंटरसेप्टर बोटींच्या साहाय्याने ही मोहीम फत्ते केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *