Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनेचं ‘हिंदुत्व’ भाजपच्या हिंदुत्वा पेक्षा निराळं : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

शिवसेनेचं ‘हिंदुत्व’ भाजपच्या हिंदुत्वा पेक्षा निराळं : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका नवीन पुस्तकात सांगितले आहे की शिवसेनेच्या विचारसरणीत ‘हिंदुत्व’ एकच आहे. परंतु ते भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे. विदयार्थी-कार्यकर्ती गुरमेहर कौर लिखित पुस्तक “द यंग अँड द रेस्टलेस” ज्यात उमर अब्दुल्ला, सचिन पायलट, आदित्य ठाकरे आणि शेहला रशिद सह देशातल्या युवा नेत्यांच्या मुलाखतींची एक शृंखला आहे.

आदित्य या पुस्तकात म्हणाले आहेत की, “साधारणपणे शिवसेना सारख्या पक्षाला दक्षिणपंथीय मानलं जातं, कारण आम्ही हिंदुत्वाला मानतो आणि ते आमच्या विचारधारेपैकी एक आहे. पण ते भाजपचं हिंदुत्व नाहीये, त्यापेक्षा जरा वेगळं आहे.” ते पुढे म्हणाले की आमची विचारधारा मध्यममार्गी आहे. ते म्हणाले की आम्ही व्यावहारिक अथवा प्रॅक्टिकल म्हणा आहोत आणि रात्रीच्या वेळी फिरण्याचे स्वातंत्र्य, इलेक्ट्रिक बस व प्रदूषण या सारख्या विषयांवर बोलत आहोत. आपण जाणता, की आम्ही काही वेगळ्या गोष्टींबाबत बोलत आहोत.

युवासेना प्रमुख आदित्य पुढे म्हणाले की आम्ही महाराष्ट्रात प्लास्टीक बंदीसाठी पुढाकार घेतला आहे आणि मुंबईत लोकं रात्रीच्या वेळीही निर्धास्तपणे फिरू शकावीत म्हणूनही प्रयत्न करत आहोत. या लोकसभा निवडणुकीत भलेही शिवसेनेने भाजपबरोबर युती केली तरीही काही मुद्यांबाबत त्यांच्यात मत-मंतांतरे राहिली आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *