३०१ शौर्य पदकांसह ९२ विशिष्ट सेवा आणि ६६४ गुणवत्तापूर्ण सेवा पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व सुधारात्मक सेवांतील कर्मचाऱ्यांचा समावेश
नवी दिल्ली, दि. १५ : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांची विविध पदकांसाठी निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. शौर्याबरोबरच दीर्घकाळाची कर्तव्यनिष्ठा, विशेष सेवा आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीची दखल या पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
यंदाच्या घोषणेत ३०१ शौर्य पदके, ९२ राष्ट्रपती पदके – विशिष्ट सेवेसाठी आणि ६६४ पदके – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी देण्यात येणार आहेत. या तिन्ही श्रेणींमध्ये विविध सुरक्षा व सेवाक्षेत्रांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
शौर्य पदकांमध्ये महाराष्ट्रातील ३३ जण
कर्तव्य बजावताना जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करणे, गुन्हेगारीला आळा घालणे किंवा गुन्हेगारांना पकडण्यासाठी दाखविलेल्या धाडसाची दखल घेऊन शौर्य पदके दिली जातात.
देशभरातील ३०१ शौर्य पदकांमध्ये २७२ पोलीस कर्मचारी आणि २९ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.
महाराष्ट्रातील शौर्य पोलीस सेवा पदकप्राप्त अधिकारी-कर्मचारी
१. राजू पांडुरंग गवळी – पोलीस उपनिरीक्षक
२. वासुदेव राजम मडावी – पोलीस उपनिरीक्षक
३. दिलीप विठ्ठल आत्राम – नाईक पोलीस शिपाई
४. अजय गोपाळराव मडावी – पोलीस शिपाई
५. गणेश चंद्रम दुब्बुला – पोलीस शिपाई
६. विजय झरू मडावी – पोलीस शिपाई
७. भूपेश मारोत्राव जुनमाके – पोलीस शिपाई
८. दलसू कटिया बोगामी – पोलीस शिपाई
९. राजेश शामराव किरांगे – पोलीस शिपाई
१०. मसा बोरा अत्राम – नाईक पोलीस शिपाई
११. यतिश विजयराव देशमुख, भापोसे – अतिरिक्त पोलीस अधीक्षक
१२. विजय किश्तय्या कोडपे – पोलीस हवालदार
१३. दशरथ रामशहा मडावी – नाईक पोलीस शिपाई
१४. राकेश राजम बेडकी – पोलीस शिपाई
१५. सुधाकर जगन पोर्टे – पोलीस शिपाई
१६. श्रीनिवास समय्या निष्टुरी – पोलीस शिपाई
१७. गणेश हनमंतु गजीवार – पोलीस शिपाई
१८. नितेश प्रभुदास टेंबेकर – पोलीस शिपाई
१९. शिवाजी मेस्सो हिचामी – पोलीस शिपाई
२०. संजय मल्लेश कंकाबंदवार – पोलीस शिपाई
महाराष्ट्रातील शौर्य अग्निशामक सेवा पदकप्राप्त कर्मचारी
१. मनोज विश्वनाथ सावंत – विभागीय अग्निशमन अधिकारी
२. रवींद्र नारायणराव आंबुलेकर – मुख्य अग्निशमन अधिकारी
३. अनिल वसंत परब – उपमुख्य अग्निशमन अधिकारी
४. ईश्वर खंडू कांबळे – वरिष्ठ स्थानक अधिकारी
५. योगेश हिरालाल पवार – स्थानक अधिकारी
६. दत्तात्रय अशोक भोसले – स्थानक अधिकारी
७. महेश आनंद गुदलकर – चालक-परिचालक
८. चिंतामणी शिवाजी खांडेकर – अग्निशामक
९. विकी नागेश सरवदे – अग्निशामक
१०. दर्शन घनश्याम पावडे – अग्निशामक
११. रमेश जीवन कोळी – अग्निशामक
१२. राजेश विष्णू राणे – चालक-परिचालक
१३. हर्षल शंकर कटके – अग्निशामक

महाराष्ट्रातील पाच जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
सेवाकाळातील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक – विशिष्ट सेवेसाठी दिले जाते. यंदा देशभरात या श्रेणीतील ९२ पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यात ८३ पोलीस सेवा, ४ अग्निशमन सेवा, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि २ सुधारात्मक सेवा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि दोन सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना या श्रेणीतील सन्मान मिळाला आहे.
पोलीस सेवा :
१. श्री. शिरीष रवींद्र जैन – अतिरिक्त पोलीस महासंचालक
२. श्री. सुभाष नानासाहेब भुजंग – पोलीस उपअधीक्षक
३. श्री. संजय राजाराम वायचळे – सहायक पोलीस उपनिरीक्षक
सुधारात्मक सेवा :
१. श्री. संजीव सखाराम घाणेकर – सुभेदार
२. श्री. संजय राजारामजी तलवारे – हवालदार
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६४ पदके
कौशल्यपूर्ण कामकाज, कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि सातत्यपूर्ण उल्लेखनीय सेवेसाठी पदक – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी दिले जाते. देशभरात या श्रेणीतील ६६४ पदके जाहीर करण्यात आली आहेत.
यामध्ये ६०६ पोलीस सेवा, २८ अग्निशमन सेवा, १८ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि १२ सुधारात्मक सेवा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील ३७ पोलीस कर्मचारी, दोन अग्निशमन सेवा कर्मचारी, तीन नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा कर्मचारी आणि दोन सुधारात्मक सेवा कर्मचारी या सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण सेवा पदकप्राप्त पोलीस अधिकारी-कर्मचारी
१. श्री. संजय बाजीराव जाधव – उपमहानिरीक्षक
२. श्री. विजयकुमार गोपीनाथ मगर – उपमहानिरीक्षक
३. श्री. दिगंबर पांडुरंग प्रधान – पोलीस अधीक्षक
४. श्री. प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी
५. श्री. भागीरथ शिवाजी देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी
६. श्री. प्रवीण विनायक तेजाळे – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी
७. श्री. मनोजकुमार माधवराव यादव – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी
८. श्री. वैभवकुमार जगदेवराव जाधव – पोलीस निरीक्षक
९. श्री. संतोष धनसिंग बर्गे – पोलीस निरीक्षक
१०. श्री. विश्वजीत वसंत कैगडे – पोलीस निरीक्षक
११. श्री. जितेंद्र आनंद कदम – पोलीस निरीक्षक
१२. श्री. जनार्दन यशवंत देसाई – पोलीस उपनिरीक्षक
१३. श्री. अंकुश बाबालाल न्यायनिर्गून – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
१४. श्री. विलास हनुमानराव इंगळे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
१५. श्री. मुजफ्फर अली जाफर अली सय्यद – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
१६. श्री. विनोद प्रभाकर पाटील – पोलीस निरीक्षक
१७. श्री. दिलीप भीमा धुमणे – पोलीस उपनिरीक्षक
१८. श्री. मोहन अण्णासाहेब सौदणे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
१९. श्री. दिपक अनंत ठाकूर – पोलीस उपनिरीक्षक
२०. श्री. संपत मुरलीधर खैरे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
२१. श्री. गुलाब प्रभाकर सोनार – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
२२. श्री. शेखर दशरथ फार्टले – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
२३. श्री. शेरखान दिलावरखान पठाण – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
२४. श्री. सुनील निवृत्ती कदम – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
२५. श्री. शैलेश चंद्रकांत उपासनी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
२६. श्री. प्रकाश बळीराम कदम – पोलीस उपनिरीक्षक
२७. श्री. चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर – पोलीस उपनिरीक्षक
२८. श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर – पोलीस उपनिरीक्षक
२९. श्री. अरुण पाट्रुजी आत्राम – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
३०. श्री. शिवानंद महादेव स्वामी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
३१. श्री. पांडुरंग बाप्पाजी पाटील – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
३२. श्री. अनवरअली सय्यदअली सय्यद – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
३३. श्री. गणेश शंकर शिंदे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
३४. श्री. मनोज गोपाळराव मांगरूळकर – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
३५. श्री. प्रदीप वसंतराव चौगांवकर – पोलीस निरीक्षक
३६. श्री. भारत खिमजी गोहिल – हेड कॉन्स्टेबल
३७. श्री. राजकुमार यादवराव जनबंधू – हेड कॉन्स्टेबल
अग्निशामक सेवा
१. श्री. शंकर उत्तम मिसाळ – मुख्य अग्निशमन अधिकारी
२. श्री. शैलेश महादेव जगताप – अग्निशामक
नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा
१. श्री. पोपट रामजी सांगदे – वरिष्ठ कर्मचारी अधिकारी
२. श्री. अशोक नामदेव इंगळे – गृहरक्षक
३. श्री. मनोज सदाशिव बरसागडे – गृहरक्षक
सुधारात्मक सेवा
१. श्री. विकास हनमंतू राजनळवार – अधीक्षक गट-ब
२. श्री. महेश लक्ष्मण गडनाईक – हवालदार
दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विविध सुरक्षा आणि सेवा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेतली जाते. यंदाच्या घोषणेत शौर्याबरोबरच विशेष सेवा आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा या राष्ट्रीय सन्मानातील समावेश राज्यातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल म्हणून महत्त्वाचा ठरला आहे.
