नवी मुंबईतील १२८ मालमत्ताकर थकबाकीदारांकडून ७ कोटी ४८ लक्ष रुपये वसूल
नवी मुंबई, दि. १२: मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असून त्यामधूनच नागरी सुविधा पुरविण्यात येत असल्याने मालमत्ताकर विभागामार्फत करवसूली प्रभावीपणे करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही तसेच नोटीस बजावूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद दिलाजात नसेल तर अशा थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष दिले जात असून नोटीसीला प्रतिसाद न देणा-या १२८ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामधील ३० थकबाकीदारांनी नोटीस मिळाल्यानंतर आपली थकबाकी व मालमत्ताकर जमा केला असून त्यापोटी महानगरपालिकेकडे ७ कोटी ४८ लक्ष इतकी रक्कम जमाकरण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये अमेय को-ऑप.हौ.सोसायटीमधील ३ थकबाकीदारांनी थकीत मालमत्ताकर भरणा करणेबाबत बजावलेल्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याने या तिन्ही मालमत्ताटाळे लावून सिलबंद करण्यात आलेल्या आहेत.
सदर करवसूली प्रक्रियेत महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार १ लाखापेक्षा अधिक रक्कमेचे थकबाकीदार असणा-यामोठ्या थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने यादी तयार करण्यात आली होती. यामधील 8 हजारमोठ्या थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत देऊन नोटीसा बजावण्यात आल्या. या नोटीसांनाही प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती मालमत्ता करविभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांनी दिली.
थकबाकीदारांच्या यादीनुसार यापुढील काळात थकबाकीदार सोसायट्यांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता जप्तीची कारवाई करूनही थकबाकी न भरता नोटीसीला प्रतिसादन देणा-या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई देखील सुरू करण्यातयेत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांमार्फत महानगरपालिकेस उपलब्ध होणाऱ्या मालमत्ता करामधूनच नागरी सुविधांची पूर्तता केली जात असल्यानेप्रत्येकाने आपली करभरणा वेळेत व नियमीत करावी तसेच थकबाकी असल्यास तीही वेळेत भरुन नवी मुंबई शहर विकासात आपला सहभाग दयावा आणि नवी मुंबई शहराचे प्रतिष्ठीत नागरिक व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
