शिवव्याख्याते शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील घेऊन आले आहेत “मी महाराष्ट्र” मोहीम
औरंगाबाद: जनआशिर्वाद यात्रा, माऊली संवाद, आदित्य संवाद आणि प्रथम ती महिला संमेलन नंतर शिवसेना आता अजून एक कार्यक्रम घेऊन आले आहेत. सुप्रसिद्ध शिवव्याख्याते शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील हे ‘मी महाराष्ट्र’ मोहीमेच्या मार्फत अखंड महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
शिवसेनेने उपनेते नितीन बानुगडे पाटील “मी महाराष्ट्र” मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. ही मोहीम आज १४ सप्टेंबर २०१९ पासून औरंगाबाद येथून सुरू झाली आहे. बानगुडे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यानांसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ‘मी महाराष्ट्र’ मोहिमेच्या पहिल्याच दिवशी त्यांना ऐकण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.