‘या’ १३ जणांची लागली मंत्रिपदी वर्णी
मुंबई: राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर आज करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या विस्तारकडे राजकीय धुरीणांचं लक्ष लागून राहीलं होतं. या विस्ताराचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन महिन्यांपूर्वी विरोधीपक्षनेते राहीलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आजच्या या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. आपल्या नवनिर्वाचित १८ खासदारांसोबत ते उत्तरेत अयोध्या दौऱ्यावर आहेत.
हे आहेत मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते
कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील
जयदत्त शिरसागर
तानाजी जयवंत सावंत
आशिष शेलार
डॉ. संजय कुटे
सुरेश दगडू खाडे
डॉ. अनिल बोंडे
डॉ. अशोक उईके
राज्यमंत्री
योगेश सागर
अविनाश माहतेकर
संजय भेगडे
परिणय फुके
अतुल सावे
