Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आरोग्य: जाणून घ्या गुळण्या करण्याची योग्य पद्धत

आरोग्य: जाणून घ्या गुळण्या करण्याची योग्य पद्धत

कवल/गंडूष (गुळण्या करणे)
आयुर्वेदात गुळण्या करण्याचा एक क्रम आहे. ज्यामुळे तुमचे नुसते दात नाहीत तर मुख व चेहऱ्यावरील इतर मांसपेशीना बल प्राप्त होते.

** प्रथम स्नेह गंडूष

कोमट तीळ तेल मुखात काही काळ धरून ठेवावे व त्यानंतर त्याची गुळणी करून ते बाहेर टाकावे.
मुखातील दुर्गंधी, सूज, सुप्तता, वाईट चव ह्यांचा नाश होतो, मुखातील व चेहऱ्यावरील मांसपेशी बळकट होतात. ओठ फुटणे कमी होते.

** द्वितीय कषाय गंडूष

वैद्याच्या सल्ल्याने त्रिफळा, खदिर इ. चा काढा गुळण्यांसाठी वापरावा. ह्यामुळे मुखाची शुद्धी होते. पस, अधिक लाळ गळणे इ. त्रास दूर होतात.

** तृतीय कोष्ण जल गंडूष

कोमट पाण्याने गुळण्या करणे, ह्यामुळे तोंड स्वच्छ होते. दात घासल्यानंतर अश्या प्रकारे गुळण्या कराव्यात असे आयुर्वेदात सांगितले आहे. ह्यामुळे संपूर्ण मुखाची स्वच्छता होते व दंत रोगांचा नाश होतो.

आज आपण गुळण्या करणे ह्या ह्या छोट्याश्या विषयावर आयुर्वेदाचे मत पहिले. विषय जरी छोटा असला तरी तो महत्वाचा आहे म्हणूनच ह्याचा सखोल विचार करावा निदान आठवड्यातून दोनदा अथवा तीनदा तरी ह्या प्रकारे गुळण्या कराव्यात व दात घासताना योग्य गोष्टींची निवड करावी.
दात घासण्यासाठी आवश्यक चूर्ण जरी दिले असेल तरी त्याचे प्रमाण वैद्याच्या सल्ल्यानेच ठरवावे, तसेच काढ्याच्या गुळण्या देखील वैद्याच्याच सल्ल्याने कराव्यात, हे आरोग्यासाठी हितकर आहे.

भेटूया पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।

लेख आवडला असल्यास   शेअर करा  ।   LIKE  करा  ।  कंमेंट करा  

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *