Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नव्या काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला बंद लिफाफ्याआड

नव्या काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला बंद लिफाफ्याआड

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी चार पानी निवेदन देत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता काँग्रेस अध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार निवडीचे काम सुरू झालेले आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष तरुण असावा असे एका गटाचे मत आहे तर ज्येष्ठ नेते अध्यक्ष पदासाठी सर्वात लायक उमेदवार राहतील असे दुसर्‍या गटाचे मत आहे.

राष्ट्रीय स्तरावरील सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी चार चार नावं बंद पाकिटातून द्यावीत अशा सूचना काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्या आहेत. हि नाव आल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य चर्चेअंती एका नावावर शिक्कामोर्तब करतील. सध्यातरी जर युवा नेत्यांच्या नावाचा विचार करायचा झाला तर दोन नावं आघाडीवर आहेत पहिलं नाव ज्योतिरादित्य शिंदे व दुसरे नाव सचिन पायलट हे आहे. हे दोघेही राहुल गांधी यांच्या खास गोटातले मानले जातात आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सुशीलकुमार शिंदे व मल्लिकार्जुन खर्गे ही दोन नावं आघाडीवर आहेत. आता कोणाच्या गळ्यात काँग्रेसचे अध्यक्षपदाची माळ पडणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *