राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय दिना पाटील यांनी सोडली पवारांची साथ, हाती घेतला भगवा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस ला लागलेले ग्रहण काही केल्या सुटायचे नाव घेत नाहीये. मुंबईतील सचिन भाऊ आहिर यांच्या नंतर राष्ट्रवादीचे बडे नेते ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजय दीना पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवालय येथे शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
संजय दिना पाटील यांचे भांडुप परिसरात मोठे प्रस्थ आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपचे मनोज कोटक यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. संजय दिना पाटील हे स्थानिक भूमिपुत्र असून त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक आगरी-कोळी मतदारांची मतं सेनेच्या पारड्यात पडू शकतात.
