व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा युतीवर निशाणा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात शिवसेना – भाजप मध्ये पुनः युती झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी युतीवर टीका केली. सध्या सोशल मीडिया वर राष्ट्रवादीची टीम मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालीय. नवनवीन कल्पना लढवून ते युतीवर टीका करण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवरच्या माध्यमातून शिवसेना- भाजपाच्या युतीवर अशीच एक व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. यात त्यांनी दोघांना विंचू म्हणून दाखवले आहे. जे एकमेकांना डसत आहेत. त्यावर कॅप्शन आहे….. “मित्रपक्ष म्हणजे सक्तीची युती की सत्तेसाठी युती… पर ये पब्लिक है, ये सब जानती है…” असे म्हणत राष्ट्रवादीने एक व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. यात एकमेकांना डसलो तरी फरक नाही पडणार, असे या व्यंगचित्रात लिहण्यात आले आहे.
