Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video पहा : सोशल मीडियावर ‘कलंक’ चा टीझर हिट !

Featured Video Play Icon

Video पहा : सोशल मीडियावर ‘कलंक’ चा टीझर हिट !

‘कलंक’ या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय आणि सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजत आहे. ‘जब किसी और की बर्बादी अपनी जीत जैसी लगे तो हमसे ज्यादा बर्बाद और कोई नहीं दुनिया में’ या लक्षवेधी आवाजातील संवादाने टीझरची सुरुवात झाली आहे.
डोळे दिपवणारे भव्य दिव्य सेट आणि बॉलिवूडमधील दिग्गजांच्या भूमिकेने सजलेल्या या ‘कलंक’ चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला.

‘कलंक’ चित्रपटाची कथा नेमकी काय हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. टीझर पाहून प्रेम, ताटातूट, दु:ख, आनंद या सगळ्याच भावनांची कथा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे याची खात्री वाटत आहे. टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये रावणाचा वध होतो आणि आलिया व वरूण एकमेकांना भेटतात, असे दाखवण्यात आले आहे. ‘कलंक’चा हा टीझर सोशल मीडियावर तुफान हिट ठरला आहे.

माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला कलंक हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *