Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मतदारांनो जागरुक व्हा, मतदान करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

NAMO TWEET

मतदारांनो जागरुक व्हा, मतदान करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्ष प्रचारासाठी सज्ज झाले आहेत त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व प्रमुख विरोधक, युवा नेते, सेलिब्रिटी यांना टॅग करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये मतदानाविषयी मतदारांना जागरुक करण्यासाठी मोदी यांनी आवाहन केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रेरित करायला हवे असे आवाहन करणारे एक ट्विट मोदींनी सर्व प्रमुख विरोधकांना टॅग करून केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक ट्वीटर हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपचे नेते अखिलेश यादव, बसप अध्यक्ष मायावती, डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलीन आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांना ट्वीटमध्ये टॅग केले आहे.

तरुणांना मतदानासाठी प्रेरित करा असे आवाहन त्यांनी आपल्या अजून एका ट्वीटमध्ये केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, चिराग पासवान आणि हरसिम्रत बादल यांना टॅग केले आहे.

तसेच देशभरातील उद्योगपती, सेलिब्रिटी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, क्रिडा क्षेत्रातील खेळाडू, गायक या साऱ्यांना देखील त्यांनी टॅग करून मतदानाला प्रोत्साहित करा असं आवाहन केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *