नारायण राणेंनी एका बाजूला दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा तर दुसऱ्या बाजूला निलेश राणे पहा काय म्हणाले
सिंधुदुर्ग: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि हळूहळू राजकीय पटलावर वेगळंच चित्र दिसायला लागलंय. एकमेकांसाठी कडवट भाषा वापरलेले नेते आता सौम्य भाषेचा वापर करत, टीका टिप्पणी करणे टाळत आहेत.
याच यादीत भाजपचे राज्यसभेतले खासदार नारायण राणे हे अग्रस्थानी आहेत. निकाला नंतर विविध ठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय वैरी असलेल्या शिवसेनेबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल समोपचाराची भाषा वापरायला सुरुवात केली आहे. अशाच एका पत्रकाराच्या नितेश राणे यांच्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मंत्रिमंडळात जर त्यांची कुचंबणा होणार नाही. जो तो मंत्री आपली जबाबदारी पार पाडत असतो. एकमेकांशी सहकार्य केल्याशिवाय कामं होत नाहीत.” तसेच त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार नितेश राणे यांच्या मंत्रिपदाच्या मार्गात अडचण येऊ नये यासाठी नारायण राणें नी आपली तलवार म्यान केल्याचे दिसते पण त्याचवेळी त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून काही केल्या उद्धव ठाकरें वर टीका करणे थांबत नाहिये. कालच निलेश राणे यांनी एक ट्विट करत याची प्रचिती दिली. आपल्या ट्विट मध्ये मतदात्यांचे आभार मानत ते पुढे म्हणाले की, “ज्यांनी ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, साथ दिली त्या साऱ्यांचे मनापासून आभार आणि ह्या आमच्या विजया मुळे कलानगरच्या कवट्या महाकाल ला बसली एक कानपटीत.”
ज्यांनी ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, साथ दिली त्या साऱ्यांचे मनापासून आभार आणि ह्या आमच्या विजया मुळे कलानगरच्या कवट्या महाकाल ला बसली एक कानपटीत. pic.twitter.com/9FaNOwXZjF
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 25, 2019
या टीकेमुळे शिवसैनिक राणे परिवारावर पुनः खवळल्याचे पाहायला मिळत आहे.
