Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा उल्लेखनीय उपक्रम, लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावरील बेघरांचा केला ‘असा’ मेकओव्हर

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा उल्लेखनीय उपक्रम, लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावरील बेघरांचा केला ‘असा’ मेकओव्हर

नागपूर: सध्या देशभर सक्तीचा लॉकडाऊन लागू आहे. यावेळी ज्यांच्याकडे घर-दार आहे ते आपापल्या घरात निवांत बसून दोन घास खाऊ शकतात. पण जे रस्त्यावर राहणारे बेघर, भटके आहेत त्यांचे खूप हाल होत आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एक अभिनव प्रयोग या दरम्यान सुरू केला आहे.

लॉकडाऊनदरम्यान रस्त्यावर भटकंती करणाऱ्या लोकांना मनपाने बेघर निवाऱ्यात आणले. या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतल्या जात आहेत. फटाक्या कपड्यांच्या जागी आता ते स्वच्छ नव्या कपड्यांत दिसत आहेत शिवाय त्यांचे वास्तव्यात वाढलेल्या केसांना व दाढीलाही कात्री लावण्यात आली आहे. एकूणच त्यांचा मेकओव्हर करण्यात आलेला आहे. या संदर्भातील काही फोटो तुकाराम मुंढेंनी आपल्या फेसबुक पेज वर प्रसिद्ध केली आहेत. आपल्या याच कामाच्या हटके शैलीमुळे मुंढे ज्या ठिकाणी जातील तिथल्या लोकांच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *