Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण

मुंबई: १३ जुलैच्या महाराष्ट्र वार्तामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या काही अनियमित कारभाराविषयी वृत्त प्रसिद्ध झाले. अध्यक्षांनी आपले स्वतःचे पोर्ट ट्रस्टचे इस्पितळ सुसज्ज आणि विस्तारित करण्याऐवजी हे इस्पितळ आणि आजूबाजूची प्रचंड जागा कवडीमोलाने एका खाजगी कंपनीला देऊन नुकसान केले अशा स्वरूपाच्या या वृत्तामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टमधील दोन कामगार संघटना मात्र क्रियाशील झाल्या. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि हॉस्पिटल चालविण्याचा प्रकल्प हाती घेणाऱ्या मेसर्स झोडियाक हिलोट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (डि.वाय.पाटील हॉस्पिटल ने आयत्या वेळी निर्माण केलेली नवी कंपनी) यांच्यामध्ये ३.१०.२०१९ रोजी झालेल्या करारामधील महत्वपूर्ण अटींचे पालन न करताच भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून झोडियाक कंपनीवर मेहेरबानी करण्याच्या हेतूने सारे हॉस्पिटल आणि जागा या कंपनीला २२.०७.२०२० रोजी हस्तांतरण करण्याचा पोर्ट ट्रस्टने डाव रचला आहे अशी आवई उठवून दोन्ही संघटनांनी एकत्रितपणे मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.

दि. २४.०७.२०२० रोजी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयापूढे सुनावणीला आली असता पोर्ट ट्रस्टने आणि या ‘झोडियाक’ कंपनीने न्यायालयापुढे विधान केले कि ०३.१०.२०१९ च्या करारामधील अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल आणि त्यानंतरच हस्तांतरण केले जाईल. त्यामुळे न्यायालयातील प्रकरण निकालात काढण्यात आले. या खासगी कंपनीकडून आणि पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनाकडून यापुढे करारामधील सर्व अटींचे पालन केले जाईल, यासाठी संघटना जागृत राहतील असा खुलासा या संघटनांकडून होत आहे. मात्र संघटनांच्याकडून फार उशिरा होणाऱ्या कृतीबद्दल कामगारांमध्ये असंतोष आणि काहीसे संशयाचे वातावरण पसरले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *