फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा
मुंबई, दि. १०: सातारा जिल्ह्यात फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसने आज गिरगाव चौपाटी इथं निदर्शन केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. युवक काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. आंदोलनकर्ते तिथे पोहोचण्याआधीच पोलिसांनी गिरगावात मोर्चा अडवला.
यावेळी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानु चिब, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत तसेच राज्यातील इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित होते.
