Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खुशखबर! येत्या ४८ तासात मॉन्सूनचं होणार केरळात आगमन

खुशखबर! येत्या ४८ तासात मॉन्सूनचं होणार केरळात आगमन

केरळ: देशभर लोकं गर्मीने हैराण झाली आहेत. या भीषण गर्मी मध्ये हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेने एक चांगली बातमी दिली आहे. ‘स्कायमेट’ चे वरिष्ठ वैज्ञानिक समर चौधरी यांनी सांगितलं की ४८ तासाच्या आत मॉन्सून केरळमध्ये पोहचू शकतो. परंतु ते म्हणाले की मॉन्सून या वर्षी कमजोर राहील. अल-निनो आणि ग्लोबल वोर्मिंग मुळे या वर्षी मॉन्सून कमजोर राहण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे.

देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट अजून कायम आहे. पश्चिम राजस्थान तसेच पूर्व राजस्थानातील मैदानी भागात उष्माघाता मुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. देशातल्या काही भागात अशीही परिस्थिती आहे की जिथे माणूस थेंबा-थेंबा साठी तरसत आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार च्या काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष आ वासून उभं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *