रिझर्व्ह बँकेची खातेधारकांसाठी खुशखबर, RTGS व NEFT वरील शुल्क रद्द
मुंबई: RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये 0.25 टक्के कपात केली आहे. गृह व वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे. आता त्यांच्यावरील EMI चं ओझं कमी होईल. ही सलग तिसरी वेळ आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. आता रेपो रेट ६ टक्क्यांवरून घटून ५.७५ % झाले आहेत. तसेच रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्क्यांवरून ५.५० टक्के झाले आहेत. सप्टेंबर २०१० नंतर पहिल्यांदा रेपो रेट ६ टक्क्यांच्या खाली आले आहेत.
NEFT आणि RTGS वरून पैसे ट्रान्सफर केल्यावर नाही लागणार शुल्क : RBI ने आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारावर लागणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्व बँकांना याचा फायदा ग्राहकांना पोहचवण्याचे निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेण्यामागचे प्रमुख कारण डिजिटल पेमेंट ला चालना देणे हा असल्याचे मानले जाते.
