कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणी दूर करण्याचं मोहन भागवतांचं आवाहन
आज नागपूरमधल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित संघाच्या विजयादशमी आणि शस्त्र पूजनदरम्यान ते बोलत होते. सरसंचालकांचं भाषण केवळ ५० सदस्यांसमोर सादर झालं. आणि त्याचं ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आलं.
राजकारणातली स्पर्धा ही दोन शत्रूमधलं युद्ध नसून ही स्पर्धा निकोप असायला हवी. त्यात कटुता निर्माण झाल्यास त्याचा लाभ देशात कलह निर्माण करणारी तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे असं परखड मतही सरसंघचालकांनी व्यक्त केलं. चीन संदर्भात केंद्र शासनानं घेतलेल्या भूमीकेची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या शेजारील राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध करण्याचा वेग वाढवला पाहिजे, तसंच त्यात अडथळे आणणारे वाद, मतभेद त्वरित दूर करायला हवेत असंही ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या आजच्या उत्सवात पथसंचलन, कवायती झाल्या नाहीत. स्वयंसेवकांनी घराजवळ गटनिहाय विजयादशमी उत्सव साजरा केला.
