Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लवकरच स्वप्निल जोशी दिसणार हटके लूकमध्ये

Swapnil Joshi Mogara Phulala

लवकरच स्वप्निल जोशी दिसणार हटके लूकमध्ये

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आपल्याला अनेक चित्रपटामध्ये नवनव्या भूमिका साकारताना दिसतो.

लवकरच स्वप्नील एका हटके अंदाजात प्रेक्षकांपुढे येणार आहे. सरकारनामा, लपंडाव अशा चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी देवधरच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून यात स्वप्नील जोशी अगदी वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. सुनील कुलकर्णी असे त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे.

स्वप्नीलच्या नव्या लूकचा फोटो चित्रपट निर्मात्यांसोबत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

‘मोगरा फुलला’ हा चित्रपट मुळात एका प्रेमकथेवर आधारित आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सुनील कुलकर्णी लग्नाचे वय उलटून गेले तरी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहतो. पण एके दिवशी आपण प्रेमात पडल्याची जाणीव त्याला होते. तो जिच्या प्रेमात पडला आहे ती एक सधन कुटुंबातील पण स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची तरुणी आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *