Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शरद पवारांनी मोदी सरकार वर ओढले आसूड

म्हणाले भाजपाने जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत

ठाणे, दि. २९ : भाजपाने देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्तेत आल्यावर लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं आश्वासन भाजपानं दिलं होतं, अद्यापी तीस टक्के लोकांना शौचालय मिळालेलं नाही, घरोघरी वीज देणार होते, पण केवळ सहासष्ट टक्के गरजुंकडेच वीज पोहोचली आहे, सगळ्यांसाठी घरं म्हणाले, आतापर्यंत तीस टक्के लोकांनाच मिळाली आहे.

घरोघरी पाणी देण्याच्या योजनेची मुदतही वाढवली आहे. ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा अद्याप मिळालेली नाही, असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनी महिला सक्षमीकरण करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलले. त्याच दिवशी बिल्कीस बानो प्रकरणातल्या आरोपींना सोडलं. इडी आणि सीबीआयचा दुरुपयोग होतोय, बिगर भाजपा सरकारं पाडली जात आहेत, या सर्व प्रकारामुळे जनता नाराज असून, आम्ही येत्या दोन वर्षांत बिगर भाजपाशासित राज्यात जनमत तयार करण्याचं काम करू, असं पवार म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *