Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठरलं! मनसे विधानसभा निवडणुक लढवणार, दोन उमेदवारांच्या नावाचीही झाली घोषणा

ठरलं! मनसे विधानसभा निवडणुक लढवणार, दोन उमेदवारांच्या नावाचीही झाली घोषणा

मुंबई: आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वांद्र्यातील एमआयजी क्लब येथे निवडणूकपूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट केले.

याच कार्यक्रमात २ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. ज्यात मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील व नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांचा समावेश आहे. या दोघांनी याच कार्यक्रमात मनसेत जाहीर प्रवेश केला.

विधानसभा निवडणूक २०१९ करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा ५ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतली जाणार असल्याचे पक्षातर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *