मेगा ब्लॉक वार्ता: कुठे आणि कधी
उपनगरीय रेल्वे सेवा उद्या २१ जुलै रोजी मेगा ब्लॉकमुळे बाधित राहणार आहे. आज शनिवारी मध्यरात्री हार्बर मार्गावरील माहीम स्थित धारावी उड्डाणपुलाच्या गार्डरचे काम सुरू केले जाणार आहे.
मेगाब्लॉक कधी आणि कुठे
मध्यरेल्वे – मेन लाईन
मुलुंड ते माटुंगा उप फास्ट वर स. ११:१५ ते दु. ३:४५ वाजेपर्यंत
ब्लॉक दरम्यान सीएमएमटी च्या दिशेने जाणारी जलद वाहतूक दिवा ते परळ दरम्यान स्लो लाईन वर चालवण्यात येणार आहे. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत जाईल व दिवा स्थानकातूनच परत रत्नागिरी साठी सुटेल.
पश्चिम रेल्वे
बोरिवली ते भाईंदर उप व डाऊन स्लो लाईन
वेळ: स. ११:०० ते दु. ३:०० वा.
हार्बर लाईन
सीएसएमटी ते चुनाभट्टी व वांद्रे मार्ग
वेळ: अप मार्ग – स. ११:१० ते दु. ३:४० व डाऊन मार्ग स. ११:४० ते ४:१० वाजेपर्यंत
ब्लॉक दरम्यान सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यान दोन्ही बाजूने लोकल सेवा खंडित करण्यात येणार आहे.
