कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून गोदावरी तीरावरील घाटांची पाहणी
आयुक्त सिंह यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांसह देश- विदेशातून भाविक येणार आहेत. त्यांच्या अमृत स्नानासाठी घाट सुरक्षित करावेत. त्यासाठी घाटांची दुरुस्ती करून आवश्यक तेथे कठडे बसवावेत. घाटांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करीत पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करावे.
भाविकांचे स्नान, वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, घाटांची क्षमता, पाण्याची खोली, विद्युतीकरण, आपत्कालिन मार्गांची पाहणी करावी. या सर्व सुविधा अद्ययावत कराव्यात, तसेच भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत पूर्ण होतील याचे नियोजन करावे, अशाही सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. आयुक्त खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती दिली, तर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी घाटांचे बांधकाम, दुरुस्ती याच्या नियोजनाची माहिती दिली.

