Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा मोठा विजय

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा मोठा विजय

हेग: पाकिस्तानच्या कारागृहात कैद असलेले भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या भारताचा काल मोठा विजय झाला. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या आग्रहाला स्वीकारत पाकिस्तानच्या सैनिकी न्यायालयाने एकतर्फी दिलेल्या फाशीच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिलेली आहे. त्याचसोबत पाकिस्तानला “व्हिएन्ना” कराराचे पालन न केल्याबद्दल खडे बोलही सुनावले आहेत आणि आदेश दिला आहे की भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना जाधव यांना भेटण्याची परवानगी द्यावी.

जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेची समीक्षा करण्याचे आदेश हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. पण कालच्या निकालाने तत्काळ कुलभूषण जाधव यांची सुटका होणं जरी शक्य नसलं तरी त्यांच्याविरोधात पाकिस्तानात नव्याने खटला सुरू होऊन त्यांना व भारताला आपली बाजू मांडण्याची संधी नक्की मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेत निकाल देताना १५ न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने तर एका न्यायाधीशांनी विरोधात निकाल दिला. ज्येष्ठ विधिज्ञ हरेश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली.

३ मार्च २०१६ रोजी पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातून जाधव यांना अटक केल्याचा पाकिस्तानने दावा केला होता. तर भारताने त्याविरोधात आरोप केला की व्यवसायानिमित्त इराण ला असताना पाकिस्तान गुप्तचर विभागातल्या लोकांनी त्यांचं अपहरण करत त्यांना पाकिस्तानात आणलं होतं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *