Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ. आंनद नाडकर्णी आज “माईंड जिम” च्या भेटीला; कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश

सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ. आंनद नाडकर्णी आज “माईंड जिम” च्या भेटीला; कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश

‘स्वत:विषयी जाणीव असणे, स्वत:च्या मर्यादा लक्षात घेणे, स्वत:च्या क्षमता ओळखून राहाणे, अधिकची अस्वस्थता येऊ न देणे याबरोबरच एकटेपणा आनंदात घालवता येणे आणि कोणताही प्रसंग योग्य पद्धतीने हाताळता येणे हे निकोप आणि प्रगल्भ मनाचे लक्षण आहे. या मानसिकतकडे नेण्यास ‘माईंड जिम’ सहाय्यभूत ठरते. कुठले दृष्टिकोन वाजवी आणि अवाजवी? स्वसंवाद कसा ओळखायचा? रागावर नियंत्रण कसे आणायचे? सहानुभुतीने केलेला संवाद कसा दिसतो? नातेसंबंधात किती ‘स्पेस’ असावी? संवाद कौशल्य कसे आत्मसात करावे? या सगळ्यांची उत्तरे या मनाच्या व्यायामशाळेत मिळतात’

माईंड जिम म्हणजे काय? आम्हाला यायचं आहे, कोणाला भेटू असे अनेक प्रश्न हा उपक्रम सुरु केल्यावर गेल्या वर्षभरात मला अनेकजणांनी विचारले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळू शकतील.

मानसिक स्वास्थ्य याबद्दलच डॉ. आनंद नाडकर्णी या अवलिया माणसाची मुलाखत मी आज संध्याकाळी घेणार आहे. दिनांक : १८ जुलै २०१९ गुरुवार. वेळ : संध्याकाळी : ६.३०. स्थळ : बालशिक्षण मंदिर सभागृह. मयूर कॉलनी, कर्वे रोड, पुणे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे…! आग्रहाचं निमंत्रण

– नीलांबरी जोशी

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *