कोल्हापुरात जैन पर्युषण काळातल्या मांस विक्री बंदीला होतोय तीव्र विरोध
कोल्हापूर: यावर्षी २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात जैन समाजाचे पर्युषण पर्व असणार आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या मागणीनुसार या काळात जिल्ह्यात चिकन व मटण विक्रीला बंदी घातली आहे. या बंदीमुळे सध्या कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. सकल मराठा समाज आणि क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने या बंदीचा निषेध केला आहे.
या बंदीला विरोध करण्यासाठी शुक्रवारी सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजन केले होते. प्रशासनाचा मांस विक्रीवरील बंदीचा निर्णय बेकायदेशीर आणि व्यक्तिस्वातंत्र्य विरोधात असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. तसेच ते पुढे म्हणाले की, “जैन मारवाडी गुजराती समाजाने काय खावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कुणाच्याही धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप करत नाही.”