माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई, दि. १९: सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली नसल्याने त्यांची आमदारकी जाईल, अशी माहिती या फिर्यादी पक्षाच्या वकील श्रद्धा ढुबे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र वैद्यकीय कारणास्तव कोकाटे यांची अटक न्यायालयाने पुढे ढकलली आहे. त्यांना १ लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, कोकाटे यांची आज अँजिओग्राफी झाली. त्यांना ४ ब्लॉकेज असून त्यांच्यावर बायपास सर्जरी करणं गरजेची आहे. बायपास करायची नसेल तर अँजिओप्लास्टी करावी लागेल, अशी माहिती लीलावती रुग्णालयाने दिली.
Source – AIR
