वेळ आल्यास किरीट सोमय्यांविरोधात निवडणूक लढणार – आमदार सुनील राऊत
मुंबई: लोकसभा निवडणुकीला आता काही दिवस शिल्लक राहिले असेल तरी सुद्धा शिवसेना-भाजपच्या ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांविषयी नाराजी आहे. त्यातच आज शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना तिकीट मिळालं तर मी स्वत: त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असा इशारा सोमय्या यांना दिला आहे.
भाजपने जर ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी दिली तर यंदाच्या निवडणुकीत भाजपला ह्या सीटसाठी पाणी सोडव लागेल,” असं सुनील राऊत यांनी सांगितलं.
वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधातच निवडणूक लढवणार,’ असा निर्धार सुनील राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांची डोकेदुखी आता आणखीच वाढणार आहे.
सुनील राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू असून ते मुंबईतील विक्रोळी मतदारसंघाचे आमदार देखील आहेत.
