Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अपयश वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपवण्याचा मोदींचा प्रयत्न : मनसे

अपयश वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपवण्याचा मोदींचा प्रयत्न : मनसे

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येताच सर्व पक्षांनी जागोजागी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथे आपल्या पक्षाची पहिली सभा घेतली.

या सभेला म्हणावी तितकी गर्दी झाली नाही असे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिल्या रांगेत भाजपा समर्थकांची गर्दी दिसत आहे तर मागच्या अनेक रांगामध्ये खुर्च्या रिकाम्याच होत्या.

मेरठ येथे मोदी यांनी घेतलेल्या पाहिल्याच सभेमध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत असल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून मोदींची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, “मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारलं, मग कर्नाटकने, त्यानंतर ५ राज्यातील जनतेने नाकारलं. मोदींच्या आता कोणत्याच क्लुप्त्या काम करणार नाहीत…मोदी सरकारने स्वतःचं अपयश सैन्याच्या, वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जनतेच्या लक्षात आला आहे”.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *