Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कल्याण मधील सम्राट विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क हेल्मेट घालून काढली हटके प्रभात फेरी

कल्याण मधील सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क हेल्मेट घालून काढली हटके प्रभात फेरी

शालेय विद्यार्थ्यांनी हेलमेट घालून नागरिकांना हेल्मेट घालण्याची केली विनंती

कल्याण, ७: रस्ते अपघात हा एक अत्यंत ज्वलंत सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. अपघातामुळे व्यक्तिला विविध परिणामांना सामोरे जावे लागते. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे प्रमाण कमी करण्याकरीता भारत सरकार द्वारा विविध कार्यक्रम केले जातात पोलीस रेझिंग डे, रस्ता सुरक्षा अभियान यातीलच पोलीस रेझिंग डे या निमित्ताने कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालून प्रभातफेरी काढली व नागरिकांचे लक्ष वेधले. विद्यालया पासून हेल्मेट प्रभातफेरी पोलीस शहर वाहतूक चक्कीनाका शाखा कोळशेवाडी कल्याण पूर्व येथे सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट घातलेल्या दुचाकी वाहन चालक नागरिकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. व हेल्मेट न घातलेल्या वाहनचालक नागरिकांना नमस्कार करून हेल्मेट घालण्याची विनंती केली.

महाराष्ट्र राज्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे साहेब यांच्या सहकार्याने सेल्फी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेट्टी यांचे वाहतूक व रस्ते अपघात या विषयावर शालेय परिसरात चित्र प्रदर्शन आयोजित केले होते .त्या प्रदर्शनाचा लाभ पालक व विद्यार्थी यांनी घेतला संजय ससाने यांनी भ्रमणध्वनीवरून विद्यार्थ्यांना आपापल्या पालकांना व शेजाऱ्यांना हेल्मेट वापरुन दुचाकी चालवण्याची विनंती केली. सुंदर जीवन जगण्याचा सल्ला दिला. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या कल्पनेतून सदर कार्यक्रम घडवून आणला. हेल्मेट प्रभात फेरीत शहर वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव वेलके त्यांचे सहकारी शांताराम सांगळे शैलेश तिवारी जवाहर बाल भवन मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष अनिल बोरनारे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील सुजाता नलावडे आर.एस.पी. समादेशक मनीलाल शिंपी सेल्फी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेट्टी व शाळेचे शिक्षक गणेश पाटील रामदास बोराडे यांचा सहभाग होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *